नाशिक/प्रतिनिधी – चला मुलांनो, शाळेत चला या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरू होणार आहेत. या शाळा सुरू करतांना शिक्षण व आरोग्य विभागाने गावपातळीवर समन्वयाने नियोजन करून राज्य शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती आणि कोरोना पश्चात आजारांबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एक महिन्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा ‘चला मुलांनो शाळेत चला’ (बॅक टू स्कुल) या मोहिमेंतर्गत सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. या अनुषंगाने ज्या कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यात येणार आहेत, तेथे शिक्षण व आरोग्य विभाग तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण विभागाने शाळा सुरू होणार असलेल्या शाळांतील शिक्षकांची आरटीपीआर तपासणी करून घ्यावी. तसेच राज्य शासनाच्या सुचनांप्रमाणे दर सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी देखील प्रसिद्ध करावी. तसेच दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करून शाळा सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.आपल्या जिल्ह्यातील कोरोनामुक्त 335 गावांतील शाळांमध्ये साधारण एक लाख 31 हजार 159 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 42 हजार 840 पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती कळविली आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
संभाव्य तिसरी लाट येण्याचा कालावधी निश्चित नाही, अशा परिस्थितीत आरोग्याच्या काळजीसोबतच आर्थिकचक्र सुरू राहणे देखील महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून नागरिकांची देखील जबाबदारी वाढली असल्याने त्यांनी अनावश्यक गर्दी टाळणे, नियमित मास्कचा वापर करून कोरोनाच्या नियमांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलिस यंत्रणा रात्रंदिवस नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याने नागरिकांनी प्रशासनला नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.यावर्षी पावसाचे प्रमाणे आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने कोरोना काळात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेवून शेवटपर्यंत पाणी पुरेल यादृष्टिने नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व त्याबाबत करणयत येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, मागील एक ते दिड महिन्यात जिल्ह्यातील रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 2.2 टक्के झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण 3 लाख 79 हजार लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच लसीकरणाबाबत जसा पुरवठा होत आहे त्यानुसार लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या ऑक्सिजन निर्मीतीच्या उद्दीष्टापूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी दिली.या बैठकीस महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कामांची व पुढील नियोजनाची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.
Related Posts
-
भूकरमापक तथा लिपिक पदाची परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भूमी अभिलेख विभागातील गट…
-
कल्याण डोंबिवलीत मास्क न लावणाऱ्यांची होणार कोवीड चाचणी तर मॅरेज हॉल होणार सील
कल्याण प्रतिनिधी -वाढत्या कोवीड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नविन निर्बंध…
-
१० वी व १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता…
-
१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया होणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
सतरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९मे ते ४ जून दरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -सतरावा मिफ म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विंचूर बाजार समिती पाठोपाठ…
-
कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे…
-
हवेत गोळीबार करणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू
वर्धा/ प्रतिनिधी - वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले…
-
महामानवाची १३३ वी जयंती राजधानीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महामानव, भारतीय…
-
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
१६ तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू
प्रतिनिधी . यवतमाळ - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये रात्र अभ्यासिका सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या…
-
बारावीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील दुकाने ७ ते २ सुरू ठेवण्यास परवानगी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील…
-
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक,…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
चंद्रपूर जिल्हात टेलिफोनिक कौन्सिलिंग सुरू होणार मानसिक समस्यांसंदर्भात केल्या जाणार समुपदेशन
प्रतिनिधी . चंद्रपूर - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती संदर्भात…
-
शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून सुरू केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/k1jJYv0Vzcg पंढरपूर - अकलूज टेंभुर्णी या…