Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पंढरपूर/प्रतिनिधी – पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणी बाबत नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूंबईत वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत तीन प्रास्तवित मॉडेलचे सादरीकरण झाले. तर बाधितांना योग्य ती भरपाई व पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा झाली. वास्तिवक पाहता मागील दीड वर्षांपासून प्रस्तावित पंढरपूर कॅरीडॉर आणि रस्ते रुंदीकरण याबाबत मंदिर परिसर तसेच इतरही बाधित मालमत्ता धारकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

अशातचं नेतेमंडळींकडून करण्यात येणारी संभ्रमात टाकणारी विधाने आणि शासकीय पातळीवरील हालचाली पाहता येथील नगरिकांमध्ये मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. आता पुन्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची चर्चा सुरु झाली असताना प्रस्तावित कॅरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण या विरोधात नागरिक एकवटले असून आज श्री विठ्ठल मंदिर परिसरात आत्मक्लेश आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी संभाव्य बाधित मालमत्ता धारकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X