Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पाणीपुरवठा बंद असल्याने लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी टाकला बहिष्कार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – महाराष्ट्राला निसर्गाची भरभरून साथ लाभलेली आहे. काळी सुपीक माती, पुरक हवामान असून सुद्धा आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना पाणी टंचाईसारख्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी असून देखील फक्त आणि फक्त त्याचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील नागरीक गेल्या 20 वर्षापासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. लोकसभा निवडणुकांच्या या धुराळ्यात जनतेचे प्रश्न जाणून घेण्याइतपत वेळ देखील सरकारकडे नाही आहे. वारंवार तक्रार करूनही लासलगावातील पाण्याच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. म्हणून या विरोधात लासलगावातील नागरिकांकडून आज शहरात बंद पुकारण्यात आला. पाणी टंचाई समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी दिलेल्या लासलगाव बंदच्या हाकेला नागरीक आणि व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे लासलगाव येथील नागरिकांनी सांगितले आहे.

पाईपलाईन योजनेसाठी शासनाने 17 कोटी खर्च केले होते त्याचे काय झाले? असा सवाल माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. शासनाने एवढे पैसे खर्च करून देखील 4 गावात सुद्धा योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विरोधकांवर टीका आणि आरोप करण्यात घालवला जाणारा वेळ गोरगरीब जनतेला दिला तर समाजातील अनेक मोठे प्रश्न सुटतील.

Translate »
X