नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – मोबाईल चोरी तसेच चेनस्नॅचिंग सारख्या घटना वाढत आहेत. चोरटे चोरी करण्यासाठी रोज नवनवीन संकल्पनांचा वापर करतात. अनेक लोकांना सकाळी मॉर्निंग वॉक ला जायची सवय असते. चोर अशा लोकांवर लक्ष्य ठेऊन असतात. जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकट्या दुकट्या व्यक्तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याचा फोन हिसकावून पळून जातात. वयस्कर नागरिक, लहान मुले या चोरांना बळी पडतात.
अशीच घटना डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात घडली आहे. पण यात विशेष बाब ही आहे की नगरिकांनी मिळून चोरांना चोप दिला. एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या दोन चोरट्यांनी एका नागरिकाला थांबवून त्यांच्याशी बोलण्याचे नाटक केले. नागरिकांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यातील एका चोराला पकडले यादरम्यान दुसरा पळून गेला. पकडलेल्या एका मोबाईल चोराला नागरिकांनी मिळून बेदम हानलं आणि त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. चोरट्याजवळ चॉपरर्सह गांजा असल्याचे नागरीक म्हणाले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले आहे.