नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई – यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत त्यावर इतर छोटी फुलपाखरे यांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा दर्शविण्यात आली आहे. चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत आहे. तसेच दुर्मिळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.
या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.
Related Posts
-
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी…
-
महाराष्ट्राचा चित्ररथ लोकपसंती वर्गवारीत प्रथम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘जैवविविधता व राज्य…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
केडीएमसीच्या जैवविविधता उद्यानाची घेतली राष्ट्रीय स्तरावर दखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जैवविविधता…
-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील अनुसूचित जमातीच्या…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
‘स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राचा डंका, राज्याला एकूण २३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धा हरियाणा २०२२ साठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - हरियाणा येथे होत असलेल्या…
-
साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनी राजधानी…