नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशभरातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाद्वारे आदिवासी कल्याणाचं दर्शन घडवणारा चित्ररथ, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आज राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर केला. आपल्या गौरवशाली आदिवासी वारशाचा सन्मान करणं, हा यामागील दृष्टीकोन आहे.
राष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि भरभक्कम अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचं दर्शन घडवणाऱ्या एकूण 23 चित्ररथांनी, आज 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भाग घेतला. यात राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 17 आणि विविध मंत्रालयं/विभागांच्या 6 चित्ररथांचा समावेश होता.