नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – ऑगस्ट महिना संपण्यात आला तरी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून पाऊस कधी पडेल या आशेवर आहे. जिल्हात यंदा सरासरी पेक्षा फार कमी पाऊस झाला आहे. कमी पाऊस झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिना संपायला आला आहे परंतु पाहिजे तसा पाऊस न पडल्याने मिरची पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. विहिरीतली पाण्याची पातळी घटली मोठ्या प्रमाणात घटली आहे. कमी पाण्यामुळे मिरचीची वाढ होत नसल्याचे चित्र आहे .पहिलीच आर्थिक परिस्थितीत फसलेल्या शेतकऱ्यांनी कसाबसा पैसा गोळा करून मिरचीची लागवड केली परंतु कमी पावसामुळे निश्चित मिरची पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
लागवडीसाठी लागलेला खर्च देखील जमा होणार नाही अशी परिस्थिती आहे. मागील वर्षी मिरची पिकाला चांगला भाव मिळाला म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली. परंतु निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . कमी पाण्यामुळे मिरची पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अजून कर्जबाजारी होईल यामुळे सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .