नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांना त्यांचा जीव मुठीत घालून शाळेत जावे लागते. जायकवाडीच्या एक कि.मीटर बॅकवॉटर मध्ये सडलेल्या थर्माकोल वर बसून विद्यार्थ्यांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी थर्माकोल वर अनेक वेळा साप चढतात असे विद्यार्थी सांगतात. शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ही तारेवरची कसरत करावी लागते आहे.
नदीपात्रातून बाहेर पडताना नदीपात्राच्या परिसरामध्ये असलेल्या गावातून त्यांना वाट काढावी लागते.याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु अद्यापही अहवाल दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या गावात जाण्यासाठी नऊ कोटी रुपयांतून पूल तयार होऊ शकतो. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.