नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पुणे/प्रतिनिधी – लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख आणि 11 गोरखा रायफल्स अँड सिक्कीम स्काऊट्सचे कर्नल आणि गोरखा ब्रिगेडचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल एके सिंह 16 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान सरकारी दौऱ्यासाठी नेपाळला भेट देत आहेत.
या बहुआयामी दौऱ्यात निवृत्त सैनिकांचे योगदान, सेवा आणि बलिदानाचा सन्मान करणाऱ्या कार्यक्रमात त्यांच्यासोबतच्या संवादाचा समावेश असेल. ते राजदूत, नेपाळचे लष्करी अधिकारी आणि मान्यवरांशीही संवाद साधतील. ते माजी सैनिक योगदान आरोग्य योजना पॉलीक्लिनिक (ईसीएचएस) आणि निवृत्तीवेतन कार्यालयांना (पीपीओ) देखील भेट देतील.
या भेटीमुळे भारत आणि नेपाळ यांच्यामधील परस्परसंबंधांना बळकटी मिळेल आणि सौहार्द आणि परस्परांविषयीच्या आदराची भावना वाढीला लागेल. आपल्या सन्माननीय माजी सैनिकांचा सन्मान करण्याची आणि दोन्ही राष्ट्रांमधील विशेष संबंध टिकवून ठेवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्याची आपली दृढ वचनबद्धता देखील यामुळे अधोरेखित होत आहे.