महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी मुंबई

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन

प्रतिनिधी.

मुंबई – स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे ‘सावित्रीबाई फुले शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची पहाट व्हावी यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. त्यासाठी प्रसंगी अनेक यातना, हेटाळणी, हल्ले सहन केले. स्त्री शिक्षणातूनच कुटूंब आणि पर्यायाने समाज पुरोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. स्त्रियांनीही अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यासाठी आपल्याला क्रांतीज्योती थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे राज्यात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे. या दिनानिमित्त शालेय शिक्षण विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा देणारे विविध उपक्रम नव्या पिढीच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहेत. नियोजित अशा या सर्व उपक्रमांनाही मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Posts
Translate »