नवी दिल्ली – आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.
या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे
राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी मा पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधान आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल
ज्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदने दिली तसेच चर्चा झाली ते असे आहेत:
एसईबीसी मराठा आरक्षण
इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
पिक विमा योजना : बीड मॉडेल
बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काही महत्त्वाच्या विषयांवरील निवेदने पंतप्रधानांना दिली. या पत्रांचा सारांश पुढीलप्रमाणे आहे
एसईबीसी मराठा आरक्षण
- केंद्र सरकारने मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षणासंदर्भात न्याय मागण्या विचारात घेऊन भारतीय राज्य घटनेच्या कलम १५ (४) आणि १६ (४) मध्ये घटनात्मक दुरुस्ती करण्यासाठी पाऊले टाकावीत, जेणेकरून इंद्रा सहानी प्रकरणामुळे ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा शिथिल होईल.
- राज्य शासन देखील मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वंकष फेर याचिका सादर करणार आहे
- केंद्र सरकार १०२ व्या घटनादुरुस्तीच्या मर्यादेत सर्वोच्च न्यायालयात फेर विचार याचिका सादर करणार आहे याचे मी स्वागत करतो.
इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
आरक्षणाची तरतूद आली व गेली २०-२५ वर्ष ही तरतूद राज्यात लागू आहे. परंतु, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठीच्या राजकीय आरक्षणाबाबत काही घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत व त्यामुळे ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जवळजवळ ५६ हजार जागांवर याचा परिणाम होणार आहे
माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्र देताना राजकीय प्रतिनिधीत्वासाठी मागासपणा निश्चित करण्यासाठी Rigorous Empirical Inquiry करायला सांगितली आहे. यासाठी जणगनणेतील माहितीची आवश्यकता आहे.
भारत सरकारने २०११ मध्ये SECC केला आहे त्याची माहिती राज्यसरकारला मिळाल्यास आरक्षणासाठी अभ्यास करून अहवाल करता येईल.
तसेच या निकालपत्रात SC+ST+OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केली आहे. त्यामुळे ST/SC बहुल जिल्ह्यांमध्ये OBC प्रवर्गाला २७ टक्के पेक्षा कमी किंवा एखाद्या परिस्थिती आरक्षण मिळणारच नाही. त्यामुळे SC+ST+OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादेची ५० टक्केची तरतूद शिथिल करणे आवश्यक आहे.
SC, ST यांचे आरक्षण घटनात्मक (Constitutional) आहे तर ओबीसी आरक्षण वैधानिक (Statutory) आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की SC ST प्रमाणे OBC आरक्षणही Constitutional करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी.
तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी २०२१ च्या जनगणने मध्ये ओबीसींचीही जनगणना करावी.
मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
पदोन्नतीमध्ये आरक्षण या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर केंद्र सरकारने पाऊले उचलली पाहिजे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांना न्याय दिला पाहिजे.
भारतीय राज्य घटनेच्या कलम १६ ( ४ ए ) प्रमाणे हे कर्मचारी पदोन्नतीतील आरक्षणासाठी पात्र आहेत. मात्र सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या अनेक निर्णयांमुळे त्यांना न्याय मिळण्यास उशीर लागू शकतो
हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर इतरही अनेक राज्यांचा आहे
यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखे सर्वंकष धोरण आवश्यक आहे
यासंदर्भातील प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली पाहिजे
मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
मेट्रो कारशेड डेपो करण्यासाठी राज्य सरकारने कांजूरमार्ग येथे जागा निश्चित केली आहे जी मेट्रो लाईन ३, मेट्रो लाईन ४, मेट्रो लाईन ४ ऐ, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन १४ या पाच मेट्रो लाईनला जोडण्यासाठी उपयुक्त आहे. मोठे मेट्रो जंक्शन म्हणून ही जागा विकसित होईल.
मात्र या भुखंडाच्या जागेबाबत खटला सुरु असून यात केंद्र सरकारलाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
कांजूरमार्ग येथे कारशेड डेपो केल्यास मेट्रो लाईन ३, मेट्रो लाईन ४, मेट्रो लाईन ४ ए, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन १४ ला एकात्मिक कार शेड डेपोचे फायदे मिळणार आहेत. हा डेपो मेट्रो लाईन ३ साठीच उपयुक्त नाही तर संपूर्ण मेट्रो जाळ्यासाठी उपयुक्त आहे हे यावरून लक्षात येईल.
याप्रकरणी सर्व संबंधितांना तातडीने निर्देश देऊन सर्वमान्य तोडग्यासाठी सांगावे जेणेकरून मेट्रो डेपोचे काम लवकरात लवकर सुरु होऊन तो कार्यान्वित होऊ शकेल.
राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
सन 2020-21साठी महाराष्ट्र राज्यास जीएसटी कराची भरपाई देतांना सुमारे रुपये 46 हजार कोटी रुपयांची होती. आतापर्यंत राज्यास फक्त 22 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटी रुपये जीएसटी भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. ते लवकरात लवकर मिळावे म्हणजे कोविडच्या या अभूतपूर्व संकटात आर्थिक दिलासा मिळेल
२०२१-२२ मध्येही कोरोनाचे संकट कायम राहील असे वाटते त्यामुळे राज्याचे उत्पन्न कमी होण्याची भीती आहे.
कोविडकाळात लागू लॉकडाऊन परिस्थीतीमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्यांना पुरेसी भरपाई मिळण्यासाठी संबंधित निकषांचा फेरविचार करावा.
लॉकडाऊनमुळे झालेल्या महसूल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नाही. त्यामुळे महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी पुढील 5 वर्षांसाठी वाढविण्यात यावा.
पिक विमा योजना : बीड मॉडेल
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत गेल्या 5 वर्षांत विमा कंपन्यांना प्रीमियम पोटी २३ हजार १८० कोटी रुपये दिले.
या कंपन्यांनी केवळ १५ हजार ६२२ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे दावे मंजूर केले.
राज्य शासनाने Cup and Cap मॉडेल प्रस्तावित केले आहे ज्यात विमा कंपन्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त नफा घेता येणार नाही तसेच जमा केलेल्या प्रीमियमच्या जास्तीत जास्त 10 टक्के रिस्क असेल.
हा प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी कृषी मंत्रालयाला आवश्यक ती सूचना द्यावी
बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
महाराष्ट्रासाठी बल्क ड्रग पार्क लवकरात लवकर मंजूर करावे तसेच १००० कोटी रुपये अर्थसहाय्य यासाठी द्यावे
दिघी बंदराजवळ एमआयडीसीने यासाठी २५० एकर जागा निश्चित करून ठेवली आहे.
राज्य सरकारने बल्क ड्रग पार्कसाठी काही प्रोत्साहने देखील जाहीर केले आहेत.
हा पार्क सुरु झाल्यास औषध निर्मितीस मोठे प्रोत्साहन मिळेल.
नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
- राज्य सरकारने निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना सुधारित दराने नुकसान भरपाई दिली
- एसडीआरएफ आणि एनडीआरएफ मधील निकष बदलण्यासाठी केंद्राने नेमलेल्या समितीला निर्देश देऊन महाराष्ट्र शासनाने केलेल्या सुधारित निकषांचा विचार व्हावा
- चक्रीवादळे वारंवार येत असून सागरी किनारपट्टी भागात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, स्थलांतरित नागरिकांसाठी निवारे उभारणे, किनारा संरक्षक भिंती बांधणे या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. याकरिता ५००० कोटी रुपये आवश्यक आहेत.
- केंद्राने यावर विचार करून एक वेळचा निधी यासाठी द्यावा ही विनंती आहे.
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक )
महाराष्ट्र सरकारने सन १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाऱ्या २०१८-१९ तसेच २०१९-२० च्या परफॉर्मंस ग्रॅण्ट (कामगिरी अनुदाने) राज्याला देण्याबाबतचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवले आहेत. यासंबंधीची सर्व उपयोगिता प्रमाणपत्रे (युटीलायझेशन सर्टिफिकेटस) भारत सरकारकडे पाठविण्यात आली आहेत.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने यापूर्वी महाराष्ट्रास २०१८-१९ वर्षासाठी ६२५.६३ कोटी आणि २०१९-२० साठी ८१९.२१ कोटी अशी १४४४.८४ कोटी रुपयांच्या परफॉर्मंस ग्रॅण्ट वितरीत करण्याची शिफारस केली आहे. हे अनुदान २०१९-२० या वर्षातच राज्याला मिळणे अपेक्षित असतांनाही ती अजून वित्त मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत
महाराष्ट्राला परफॉर्मंन्स ग्रॅण्ट स्वरूपात मिळणारे हे १४४४.८४ कोटी रुपयांचे अनुदान तातडीने मंजूर करण्या बाबत वित्त मंत्रालयाला सुचना देण्यात याव्यात ही विनंती
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था)
केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रास २०१६-१७ वर्षासाठी २९४.८४ कोटी देण्याची शिफारस केली आहे
२०१७-१८ वर्षासाठी ३३३.६६ कोटी, २०१८-१९ साठी ३७८.९१ कोटी, २०१९-२० साठी ४९६.१५ कोटी रुपये अद्याप वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत
विनंती आहे की एकूण १२०८.७२ कोटी रुपये थकीत निधी तातडीने मंजूर करण्या बाबत वित्त मंत्रालयाला सुचना देण्यात याव्यात ही विनंती.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी विनंती आहे
साहित्य अकादमीच्या भाषाविषयक तज्ञ समितीची यासंदर्भातील बैठक पुनश्च एकदा आयोजित होणे बाकी आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता झाली आहे अशी आमची खात्री आहे
हा विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असल्याने यावर तातडीने निर्णय घ्यावा
Related Posts
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
महा-उत्सव २०२२ चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - येत्या २२ जानेवारी…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह २०२१ चे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ सन्मान
प्रतिनिधी. मुंबई- कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी
सांगली/प्रतिनिधी - जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा…
-
नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या…
-
मंदिरं बंद पण आरोग्यमंदिरं सुरू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे/प्रतिनिधी - कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून…
-
केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावा अन्यथा टाळे ठोका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर…
-
मुख्यमंत्री यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस राज ठाकरे यांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…
-
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांती गाथा - गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
प्रतिनिधी. मुंबई- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
औरंगाबाद/प्रतिनिधी - येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात भव्य सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - सतत दौऱ्यावर असणारे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास…
-
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी . मुंबई दि. २४: संकटाच्या काळात राजकारण न करता…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
मार्ड पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांवर मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…
-
कल्याणात १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र…
-
सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्री यांच्या कडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना…
-
बीकेसी येथे कोविड१९ रुग्णालयाच्या कामाची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची पाहणी
मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या…
-
उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत आमदार अपात्रता निकालाचा केला निषेध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - आमदार अपात्रता प्रकरणाचा…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण…
-
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल-नारायण राणे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - देशभरात लोकसभा निवडणुकीची…
-
‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम…
-
डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा…
-
उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी…
-
दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले…