नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण कार्याक्रमाचे आयोजन केले होते. त्याकरिता 13 कोटी पेक्षा अधिक निधीचं नियोजन त्यामध्ये होते. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी खूप श्रद्धा आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मात्र त्याबरोबर वाढते तापमान आलेल्या नागरिकांच्या पोटात कुठलाही अन्नाचा कण नसल्याने सहा ते सात तासापासून उष्णतेच्या अवस्थेत नागरिक मृत्युमुखी पडले. मृतांचा आकडा मोठा आहे.
यावर आक्षेप असा आहे की, या कामासाठी शासनाने खूप मोठा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. पण एप्रिल महिन्याच्या उन्हामध्ये का बसवलं. व्हीआयपी लोकांसाठीच फक्त एसी रूमची व्यवस्था करण्यात आली. सर्वसामान्य भाविकांसाठी कुठलीही सोय केली नाही. यामध्ये सरकारने निष्काळजीपणा दाखवला आहे.असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी सरकार वर केले. त्यामुळे या घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा फटका जनतेला बसला. यासाठी काँग्रेस पक्षातर्फे दोन दिवसाचं महाराष्ट्र शासनाने अधिवेशन बोलावावे, अशी देखील कॉंग्रेस पक्षाची मागणी असल्याचे बाळासाहेब थोरातांनी माध्यमांना सांगितले.