नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवड्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली. या दौरादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली मधील विविध विकास कामांचा आढावा घेणार असून काही विकास कामांचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत शहर शाखांना भेट दिल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या पाठोपाठ आता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असल्याने एकनाथ शिंदे पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय सूचना देतात? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.