नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरतीच्या जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर त्या शासन निर्णयाचे दूरगामी होणारे परिणाम लक्षात घेवून सर्वत्र आंदोलने होत आहेत. शिक्षण क्षेत्र व अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे. या कारणास्तव संगमनेर येथे छात्रभारतीने आंदोलन केले आहे. सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या, शिक्षणाचे कंत्राटी करण थांबवावे, राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांना चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय गोरगरीब आदिवासी ,शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संपवणारा निर्णय आहे अशा विविध मागण्यांसाठी संतप्त झालेल्या छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर येथील बसस्थानकासमोर आंदोलन केले आहे.
यामध्ये जवळ पास १४००० पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहे .65 हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालवायला देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय धोकादायक आहे. गरिबांना शिक्षण नाकारणारा आहे, शिक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे. त्यापासून सरकारने हात काढून घेऊ नये RTE कायदा असे सांगतो कि एक किलोमीटर च्या आत शाळा असायला हवी , हा कायदा सरकार सरळ धुड्कून लावत आहे . कंपन्यांना शिक्षण चालवायला दिल्यावर मोठा फटका हा गरीब मुलांना बसणार आहे . आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा. या मागणीसाठी छात्रभारती च्या वतीने संगमनेर बस स्थानक समोर आंदोलन केले.अन्यथा छात्रभारती च्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या वेळी छात्रभारतीचे अनिकेत घुले ,टी डी एफ संघटनेचे हिरालाल पगडाळ, राहुल जऱ्हाड ,गणेश जोंधळे ,ज्ञानेश्वरी सातपुते ,वैष्णवी भोई,र सागर मोरे ,सुहानी गुंजाळ,श्रावणी गायकवाड, वैष्णवी भोईर,विशाल मिसाळ ,मकरंद जगताप, सुयश गाडे, प्रथमेश गाडे, नेहा काळे, रोशन राउत, यश मुर्तडक कावेरी आहेर ,भरत सोनवणे, आशिष घुले ,सोहम घुले ,अनिकेत खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.