महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
लोकप्रिय बातम्या

मनसैनिक जनतेच्या मदतीला घराघरात जाउन कोरोना विरोधात ‘चेस दि वायरस’ धारावी पॅटर्न

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा आकडा वाढतच आहे, अनेक उपाय योजना शासनातर्फे राबविलेल्या जात आहे. रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नको असलेल्या त्रासदायक लाॅकडाऊनला जनतेला नाहक सामोरे जावे लागत आहे.कल्याण डोंबिवलीकरांवर आलेल्या संकटातून काही प्रमाणात मुक्ती देण्यासाठी आता कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील मनसैनिकांनी  स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाढत्या कोरोना रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत म्हणुन रस्त्यावर उतरले आहेत.’चेस दि वायरस’ कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्याठी  ह्या धारावी पॅटर्न सुत्रानुसार आता प्रत्यक्ष घरा घरात जाउन प्रत्येक नागरीकांची मनसैनिकांकडून   स्क्रिनिंग, आॅक्सिजन लेवल तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच एखादा संक्षयीत रूग्ण आढळल्यास महापालिका प्रशासनाच्या मार्गदर्शन सुची नुसार संबंधित रूग्णांचे विलगीकरण व मोफत चाचणी करण्यात येणार आहे.मनसे नेते तथा आमदार प्रमोद  (राजू ) पाटील, कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर  यांचे मार्गदर्शना नुसार सध्या हे पॅंटर्न डोंबिवली येथील ग्रामीण पट्ट्यातील घारीवली,काटई उसरघर, संदप व पलावा येथे स्थानिक पदाधिकारी व माजी सरपंच योगेश रोहिदास पाटील व सर्व मनसे पदाधिकारी ह्यांचे मार्फत तसेच कल्याण मोहने कोळीवाडा येथे मनसे स्थानिक नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट, मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी राहुल मुकुंद कोट व स्थानिक मनसैनिक  हा पॅटर्न घराघरात जावून राबवत आहेत, कोरोनाच्या ह्या भयंकर संकटकाळात मनसेचे कार्यकर्ते जागोजागी अडीअडचणीतील नागरिकांना आपली मदत सेवा पूरवत आहेतच,  आत्ता उन पावसाची तमा न बाळगता घरोघरी जाऊन जो सर्व्हे करताना दिसत आहेत. मनसैनिकांच्या या समाजकार्याबद्दल मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कौतुक करत जनतेची सेवा करत रहा असे सांगितले.

Translate »
×