नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी– कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईद निमित्त वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बकरी ईदच्या दिवशी २९ जून किंवा ३० जून रोजी रात्रौ ते नमाज संपेपर्यंतच्या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-
प्रवेश बंद :- 1) कल्याण शहरातील लालचौकी कडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदरची वाहने लालचौकी येथून उजवे वळण घेवून आधारवाडी चौक – वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- 2) भिवंडीकडून कल्याण शहरातील आग्रा रोड मार्गे व गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदरची वाहने दुर्गामाता चौक येथून डावे वळण घेवून वाडेघर सर्कल-आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- 3) कल्याण (पूर्व) कोळशेवाडी बाजूकडून गोविंदवाडी बायपास मार्गे दुर्गामाता चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदरची वाहने पत्रीपूल-शिवाजी चौक-लाल चौकी येथून उजवे वळण घेवून आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- 4) कल्याण शहराअंतर्गत दुर्गाडी चौक-गोविंदवाडी बायपास-पत्रीपुल मार्गे व दुर्गाडी चौक-शिवाजी चौक-पत्रीपुल मार्गे जाणाऱ्या कंटेनर, ट्रेलर इत्यादी मल्टीएक्सल, जड अवजड वाहनांच्या वाहतुकीस बकरी ईदच्या दिवशी दिवसा व रात्रौ सर्व वेळी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना बकरी-ईद सणाच्या दिवशी (चंद्र दर्शनानुसार) दि. 29 जून 2023 रोजी किंवा दि. 30 जून 2023 रोजी रात्रौ 00.00 ते नमाजाचा कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. ही अधिसुचना फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे उप आयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे