मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी दर्शनासाठी येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर व शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्या अनुशंगाने वाहतूकीचे नियोजन करण्यात आले असून त्याबाबात अडचणी आल्यास वाहतूक नियंत्रण कक्षाच्या 8454999999 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) वाहतूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. बदल करण्यात आलेले वाहतूक मार्ग, पर्यायी मार्ग तसेच पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे.
एक दिशा मार्ग/वाहतुकीसाठी रस्ते बंद
अ. एस. के. बोले रोड – हा रस्ता सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हनुमान मंदिरापर्यंत एक दिशा मार्ग राहील म्हणजेच हनुमान मंदिरकडून एस. के. बोले रोडवर प्रवेश बंद राहील.
ब. भवानीशंकर रोड – हा रस्ता कबुतरखान्यापासून गोखले रोड दक्षिण जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील म्हणजेच गोखले रोड, दक्षिण, गोपीनाथ चव्हाण चौक येथून भवानी शंकर मार्गावर बेस्ट बसेस व अत्यावश्यक सेवा असलेली वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहिल.
क. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग :- हा मार्ग सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यत वाहतुकीकरीता बंद राहिल. तथापी स्थानिक रहिवाशांची वाहने हिंदूजा हॉस्पिटलकडून शिवाजी पार्क रोड नं. 5 म्हणजे पांडूरंग नाईक मार्ग जंक्शनपर्यत जाऊ शकतील.
ड. रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्यात येईल.
इ. ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस. व्ही. एस. रोड जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल.
ई. आवश्यकता भासल्यास दादर टी.टी. कडून कोतवाल गार्डनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टिळक ब्रिजवर बेस्ट बसेस व अत्यावश्यक सेवा असलेली वाहने वगळून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल.
फ सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने, बेस्ट बसेस वगळून माहिम जंक्शन येथून मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावर वळविण्यात येतील.

वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्गाबाबत सूचना
- 1.दक्षिण वाहीनी पश्चिम दु्रतगती मार्गे बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा 60 फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रूग्णालय येथे उजवे वळण घेता येईल अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपुलमार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.
- 2.1) उत्तर वाहीनी कुलाबा तसेच सीएसटी मार्गे उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे. 2) उत्तर वाहीनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास डॉ. ई. मोजेस रोड, रखांग चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.
- 3.पूर्व दृतगती महामार्ग:- पूर्व दृतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणारी वाहतूकीबाबत वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी, पुर्व मुक्त दृतगती मार्गाचा वापर करावा.
‘नो पार्किंग’ झोन
चैत्यभुमीकडे जाणाऱ्या शिवाजीपार्क परिसरातील एस. व्ही. एस. रोड, रानडे रोड, एन. सी. केळकर रोड, केळूस्कर रोड (दक्षिण),केळुस्कर (उत्तर), गोखले रोड (दक्षिण व उत्तर), टिळक ब्रीज, भवानी शंकर रोड, एस. के. बोले मार्ग, लखमषी नप्पू रोड, माटुंगा हे रस्ते हे दि.04/12/2021 रोजी 21.00 वा. ते दि.07/12/2021 चे 24.00 वा. पर्यत ‘नो पार्किंग’ झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
वाहने पार्किंग करिता उपलब्ध ठिकाणे
पश्चिम द्रुतगती मार्गे 1) दादर येथील सेनापती बापट मार्ग मोरी रोड ते झारापकर मार्ग, 2) कामगार मैदान सेनापती बापट मार्ग, 3) कोहिनुर स्क्वेअर मिल कंम्पा व माहिम रेती बंदर. ठाणे व नवी मुंबईकडून पूर्व द्रुतगती मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी : 1) इंडिया बुल फायनान्स सेटर, 2) लोढा कमला मिल रोड, 3) एडनवाला रोड, फिरदोस रोड,फाईव्ह गार्डन परिसर. एल.बी.एस. रोडसाठी 1) इंडिया बुल फायनान्स सेंटर, 2) लोढा कमला मिल रोड, 3) एडनवाला रोड, फिरदोस रोड, फाईव्ह गार्डन परिसर. वाशी ब्रिज- जिजाबाई भोसले मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी इंडिया बुल सेंटर व आर.ए.के.चार रोड. दरम्यान वाहतूकीच्या या बदलासंबंधीत कोणतीही अडचण असल्यास वाहतूक नियंत्रण कक्ष येथे कार्यान्वीत असलेल्या 8454999999 या हेल्पलाईन संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) वाहतूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Related Posts
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
केडीएमसीने घेतले महत्वाचे निर्णय, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास होणार मदत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण स्टेशन परिसरात…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या १२ उपनगरीय विशेष गाड्या तर ९ दादर लोकल परळपर्यंत
मुंबई/प्रतिनिधी - सहा डिसेंबर म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
ठाणे परिवहन क्षेत्रात मेट्रो-४ चे पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका,…
-
कल्याणात बाल गणेशाने दिले वाहतूक नियमांचे धडे
कल्याण प्रतिनिधी- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे…
-
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी- येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकऱ्यांनी…
-
अवैधरीत्या लाकडाची वाहतूक, ट्रकसह चालक ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाणा/प्रतिनिधी - अवैधरीत्या लाकडाची वाहतूक…
-
माचीसच्या डब्ब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला पेट
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - यवतमाळच्या पांढरकवडा…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
मद्यपी वाहनचालकाचा प्रताप, वाहतूक पोलीस कार्यलयात घातला धिंगाणा
कल्याण प्रतिनिधी- काल रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात…
-
कल्याण वाहतूक शाखेची १०४ बुलेटवर कारवाई, वाहतूक पोलिसांनी फिरवला मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वाहतूक पोलिसांनी मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन…
-
नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना सन्मान
प्रतिनिधी. भिवंडी - गोदाम पट्टा येत असलेल्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक…
-
पनवेल महामार्गावर ट्रक पलटी,वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पनवेल/प्रतिनिधी - आज सकाळी नऊ…
-
रामेश्वर धबधबा परिसरातील हिरवाई ठरतेय पर्यटकांचे आकर्षण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - विदर्भ आणि…
-
संततधार पावसाने पुलावर भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार -…
-
बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
डोंबिवली दत्तनगर परिसरातील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - अखेर त्या वादग्रस्त डोंबिवली…
-
अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी, प्रवासी आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - अवैध पदार्थाची…
-
डोंबिवली पूर्वेतील आयरे - दत्तनगर परिसरातील धोकादायक इमारत कोसळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील…
-
बस डेपोत डिझेलचा तुटवडा,वाहतूक खोळंबल्याने प्रवासी त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रोज लाखोंच्या संख्येने…
-
तानसा धरणओसंडून वाहण्याची शक्यता,परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
राजकीय दहीहंडींच्या चढाओढीमुळे नागरिकांना करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण मध्ये…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
कणकवली- कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला,वाहतूक बंद
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली –…
-
कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांची ४९३ वाहन चालकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहर वाहतूक उपशाखा कल्याण…
-
कोरोनाच्या लढाईत मध्य रेल्वे सज्ज जीवनावश्यक वस्तूची वाहतूक युध्दपातळीवर
प्रतिनिधी. मुंबई- कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.…
-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर १८ तास वाहतूक कोंडी
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - महामार्गावरील अर्धवट…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहरात…
-
कल्याणात गाडी थांबवली म्हणून तरुणाची वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण
कल्याण/प्रतिनिधी - नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार…
-
शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. शिर्डी - विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या…
-
कोल्हापूर-मुंबई विमानसेवेस नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उडान…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
रत्नागिरी पावसाळापूर्व आपत्ती आराखडा बैठक वाहतूक सुरळीत ठेवा - जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. रत्नागिरी - येणाऱ्या पावसाळयाच्या कालावधीत रस्ते वाहतूक सुरळीत राहिल…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
वाळू धोरणातील सहजतेसाठी धोरणात बदल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अवैध वाळूचोरी हा मोठा प्रश्न…
-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि…
-
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपुर/प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५…
-
अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी वाहतूक व साखर घट उतारा अनुदान मिळणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - गळीत हंगाम 2021-2022 मधील…
-
भिवंडी बायपासवर वाहतूक कोंडीची शक्यता,पुलाचे बेरिंग तुटल्याने काम सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/cOa1brw9yeM ठाणे / प्रतिनिधी - मुंबई…
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान,महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. उल्हासनगर/प्रतिनिधी - महावितरणच्या उल्हासनगर विभाग…
-
कोळशेवाडी वाहतूक विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पाच किलोमीटर दौड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त…