महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत कल्याण शहरातील शिवाजी चौक, सहजानंद चौक टिळक चौक, सुभाष चौक, साई चौक अशा महत्वाच्या जंक्शन पॉईटवर दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी दि. 7 सप्टेंबर रोजी दहिहंडी उत्सव साजरा होणार असल्याने व गोविंदा पथकाची वाहने, गोविंदा पथक व दहिहंडी उत्सव पाहण्यास येणारा जनसमुदाय यामुळे सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी या दिवशी सकाळी ११:०० वा. ते रात्रौ २२.०० वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-

प्रवेश बंद :- भिवंडीकडून दुर्गाडी चौक, लाल चौकी मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- अ) सदरची मध्यम प्रकारची वाहने दुर्गाडी चौक येथून डावे बाजूस वळण घेवून पौर्णिमा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) सदरची हलकी वाहने (दुचाकी, कार, जीप, तीन चाकी टेम्पो, इ.) लाल चौकी येथून डावे वळण घेवून आधारवाडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

पार्किंग मुभा :- गोविंदा पथकांची वाहने कल्याण पश्चिम, लाल चौकी येथील वासुदेव बळवंत फडके मैदानात पार्किंग करण्याची मुभा देण्यात येत आहे.

प्रवेश बंद :- शिळ रोडने कोळसेवाडी कल्याण (पूर्व), कडून शिवाजी महाराज चौक मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- अ) सदरची मध्यम प्रकारची वाहने पत्रीपूल येथे डावे बाजूस वळण घेवून गोविंदवाडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील. (ब) सदरची हलकी वाहने (दुचाकी कार, जीप, तीन चाकी टेम्पो, इ) गुरुदेव हॉटेल येथे डावे बाजूस वळण घेवून इच्छित स्थळी जातील.

पार्किंग मुभा :- गोविंदा पथकाची वाहने कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानात पार्किंग करण्याची मुभा देण्यात येत आहे.

प्रवेश बंद :- मुरबाड रोड आणि इंदिरानगर क्रॉस येथून संतोषी माता रोडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मधुमीरा स्वीटस्, रामबाग, लेन क्र. ४ येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने रामबाग, लेन क. ४. म्हसकर हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जातील.

पार्किंग मुभा :- गोविंदा पथकांची वाहने मॅक्सी ग्राउंड, कल्याण पश्चिम मैदानात पार्किंग करण्याची मुभा देण्यात येत आहे.

प्रवेश बंद :- मुरबाड रोडने सुभाष चौक, महात्मा फुले चौक मार्गे शिवाजी महाराज चौक कडे जाणाऱ्या व दिपक हॉटेल, कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथून मोहम्मद अली चौक मार्गे शिवाजी महाराज चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मोहम्मद अली चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- अ) सदरची वाहने कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम, वल्लीपीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

ही वाहतूक नियंत्रण अधिसुचना दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. ते २२.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×