नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – ठाणे महानगरपालिका, ठाणे कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उप विभागाच्या हद्दीत मेट्रो ४ चे काम चालू आहे. या मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. टिकुजीनीवाडी स्टेशन मानपाडा येथे यु गर्डर, विजय गार्डन से आनंदनगर दरम्यान टी व यु गर्डर, आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान सीपीसो ग्रिड टाकण्याच्या वेळी ठाणे ते घोडबंदर वाहिनी दि. 12 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत रात्री 11.५५ ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :-
प्रवेश बंद :- १) मुंबई, ठाणे कडून मोडबंदर रोडच्या दिशेने जागाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :-अ) ही वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटामार्गे इच्छित स्थळी जातील. ब) ही वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगांव टोलनाका येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :- ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- ३) नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :- ही वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
अ) मानपाडा येथे U Girder P 62-63 ( LHS / RHS) चे काम करताना मानपाडा ब्रिजखालून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहने मानपाडा ब्रिज ते टिकुजीनीवाडी सर्कल येथून उजवे वळण घेवून निळकंठ ग्रीन सोसायटी मार्गे मुल्ला बाग येथून मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील. ब) कासारवडवली येथे CPC Grid 3, 4 चे काम करताना आनंदनगर सिग्नल जवळून सेवा रस्त्याने पुढे कासारवडवली पेट्रोल पंप जवळ उजवे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील.
१) दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.
२) दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.
३) दि. १४ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १५ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.
४) दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.
५) दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.
६) दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.
७) दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजेपर्यंत.
८) दि. २१ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजेपर्यंत.
९) दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५०० वाजेपर्यंत.
१०)दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५०० वाजेपर्यंत.
११) दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. ते दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०५.०० वजे पर्यंत.
१२) दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री 11.५५ वा. दि. ३० सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी ०५.०० वजे पर्यंत.
ही वाहतूक अधिसूचना वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे