Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
करियर ताज्या घडामोडी

वक्फ बोर्ड आणि औरंगाबाद महानगपालिकेच्या परीक्षांच्या तारखा बदला – सुजात आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

औरंगाबाद/प्रतिनिधी – वक्फ बोर्ड परीक्षा आणि औरंगाबाद महानगरपालिका परीक्षेच्या यांच्या तारखा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी बसू शकणार नाहीत. काही केंद्रे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हीसाठी उपस्थित राहणे अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही एका परीक्षेची तारीख बदलावी लागेल. असे ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकरांनी सांगितले आहे.

वक्फ बोर्ड व औरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा भरती परीक्षा जाहीर झाल्या असून त्याचे प्रवेशपत्र देखील प्रसिद्ध झाले आहे. याच पार्श्वभुमीवर सुजात आंबेडकरांनी ट्विट केले.

सदर दोन्ही विभागांच्या परीक्षा IBPS ह्या एकाच कंपनीमार्फत घेण्यात येत असून वक्फ बोर्डाची कनिष्ठ अभियंता(स्थापत्य )व औंरंगाबाद महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) या पदाच्या परीक्षांची तारीख ही तरतूद एकाच दिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी आहे आणि दोन्ही परीक्षांचा वेळ देखील एकच आहे.काही परीक्षार्थीचे परीक्षा केंद्र वेगवेगळ्या शहरात असल्याने परीक्षार्थीना दोनही विभागांच्या परीक्षांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही.

विद्यार्थ्यांना देखील या निर्णयाचा त्रास सहन करावा लागत असल्याने, वक्फ बोर्ड व औंरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा भरती परीक्षा यापैकी एका विभागाची परीक्षेची तारीख व वेळ बदलण्यात यावी असे युवा नेते सुजात आंबेडकरांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X