महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स

नाशिक महामार्गावरील गांजाच्या वाहतूक प्रकरणी चांदवड पोलिसांची कारवाई ,दोघांना अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर पेट्रोलिंगदरम्यान चांदवड पोलिसांना संशयीतरित्या गांजाची कारमधून वाहतूक करताना आढळून आल्याने चांदवड पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई करत कारमधील ६ किलो गांजा, मारुती स्वीफ्ट कार, रोकड, दोन मोबाईल असा एकूण ४ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना रात्री १ वाजेच्या दरम्यान पोलीस हवालदार बाळू सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदिप आजगे यांना मुंबईच्या दिशेने जाणारी मारुती स्वीफ्ट कार (क्र. एमएच ०४ ईएस ८२८१) गोई नदीच्या पुढे महामार्गाच्या कडेला संशयीतरित्या उभी असलेली आढळून आली. पोलिसांनी कारमधील इसमांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबतची माहिती मिळताच चांदवडच्या प्रभारी पोलिस उपअधिक्षक सविता गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस हवालदार विजय जाधव, अमोल जाधव, पोलीस नाईक चेतन बागल, दिनेश सूळ, कॉन्स्टेबल विक्रम बस्ते, चंद्रकांत पवार, प्रदिप सोळंकी, विनोद लोखंडी आदींनी तातडीने घटनास्थळी जाऊन दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.

संशयीतांची सखोल चौकशी केली असता कारच्या मागील डिक्कीत गांजा आढळून आला. याबाबत पोलिसांनी ३६ हजार रुपये किमतीचा गांजा, ४ लाख १५ हजार रुपये किमतीची मारुती स्वीफ्ट कार, ६ हजार ४०० रुपयांची रोकड, ९ हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ४ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून संशयीत मोहम्मद आरीफ अब्दुल रहिम (४३, रा. इस्लामपुरा, मालेगाव) व हुजाफा मलिक जावेद अहमद (२३, मालेगाव) यांना अटक केली आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भानुदास नर्‍हे करीत आहेत.
यासंदर्भात चांदवडच्या प्रभारी पोलीस उपाधीक्षक सविता गर्ज यांनी अधिक माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×