नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडींचा नेहमीच फटका बसणाऱ्या ठाणे भिवंडी बायपासवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याला निमित्त ठरलं आहे ते म्हणजे साकेत पुलाचे तातडीने घेण्यात आलेलं डागडुजीचे काम, आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी पूल हलतो असून धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तात्काळ प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली.
त्यानंतर अस निदर्शनास आले की पुलाचा जो एक भाग जॉइंट आहे त्यामधील बेरिंग तुटल आहे. त्यामुळेच पूल हलण्याचे प्रमाण वाढलं आहे. बेरिंग तुटल्याने पुल जास्त हलतो आहे अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिली. ही बाब लक्षात येताच तातडीने काम सुरू करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली. या कामासाठी अंदाजे 6 ते 7 दिवसांचा वेळ लागणार असून त्याकरिता वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. पुलावरील नाशिक कडील एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार असून निश्चितच त्याचा फटका बसून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खड्डे आणि रस्त्याचे काम यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी याने आधीच येथून प्रवास करणे जिकरीचं बनलेलं असताना आता त्यात साकेत पुलाच्या कामाने त्यात अधिकची भर पडली आहे.