नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – श्री खंडेराय सेवा समिती कल्याण प यांचे वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही श्री खंडेराव महाराज यांचा चंपाषष्ठी उत्सव व पालखी सोहळ्याचे शारदा मंदिर हायस्कूल कल्याण पश्चिम येथे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या उत्सवाचे 20 वे वर्ष होते सदर उत्सवात श्री खंडोबा आणि म्हाळसा यांची वेशभूषा आणि वाघ्या मुरळी यांचे पारंपरिक गीत गायन व वाद्यवादन हे खास आकर्षण होते, लाल चौकी इथून खंडोबाची पालखी सुभाष नगर, मोहिंदरसिंग हायस्कूल रोड, टिळक चौक ,पार नका मार्गे लाल चौकी अशी फिरून शारदा मंदिर हायस्कुल येथे आली.
सदर पालखीच्या प्रवासा दरम्यान अनेक भाविकांनी श्री खंडोबाच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्या हायस्कूल येथील मैदानात सामूहिक तळी भंडाराचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीने उपस्थित नागरिकांनी आपापले देवाचे टाक आणून सामूहिक तळी भंडार केला या वेळी १५१ तळी भंडार करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री विश्वनाथ भोईर हे उपस्थित होते.
यावेळी लोक कलावंतांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित नागरिकांना चंपाषष्टीच्या शुभेच्छा देऊन लवकरात लवकर कल्याण मध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाचे मंदिर उभारण्याकरिता सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी झुंजारराव कार्याध्यक्ष सुधीर भगत सेक्रेटरी शरद घुगे आणि खजिनदार अशोक आव्हाड तसेच उपाध्यक्ष अशोक घुगे यांनी कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री वंदना सानप, प्रशांत म्हात्रे संतोष पंडित मनोहर बोडके सुभाष घुगे प्रतीक वाघ ,अक्षय वाघ, रोहित दरेकर महेश हिंदुराव, मोरेश्वर देशमुख विनायक सानप, माधव दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले, श्री खंडेराव महाराज यांची पारंपरिक आरती व भरीत भाकरीचा महाप्रसाद यांनी कार्यक्रमाची सांगता झाली