नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – मागे असलेल्या समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण असायला हवाय या मागणीसाठी अनेक समाज बांधव आपआपल्या समाजबांधवांसाठी एकवटून आंदोलन करत आहेत. मराठा,धनगर आरक्षणाचा प्रश्न वारंवार निर्माण होत असताना आता आरक्षणासाठी दोन्ही समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने,उपोषणे करत आहेत.धनगर समाजाकडून वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढूनही धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देण्याचा निर्णय होत नसल्याने आता पुन्हा एकदा समाज आक्रमक झाला आहे
.धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी धनगर समाजाकडून आमरण उपोषण चालु आहे.तर गेवराई तालुक्यातील खांडवी फाटा येथे कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.सरकारने आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार केला नाही तर यापुढे उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे.