नेशन न्यूज़ मराठी टिम.
डोंबिवली/प्रतिनिधी – मोटारसायकल वरुन पादचाऱ्यांच्या चैन हिसकावून धूम ठोकणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना डोंबिवलीत पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत. वारिस खान, मोहम्मद कुरेशी अशी या दोन्ही चोरट्यांची नावं असून या दोघांकडून पोलिसांनी आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल हस्तगत केली आहे. हे दोघे सऱ्हाईत गुन्हेगार असून दोघांविरोधात कल्याण डोंबिवली सह नवी मुंबई येथील पोलिस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
डोंबिवली पूर्वेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका इसमाची चैन स्नेचिंग करत या दोघांनी पलायन केले होते. या घटनेत या इसमाला देखील धक्काबुक्की करत फरफटत नेल्याने इसम जखमी झाला होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुन्हाडे, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी सुनील तारमळे, पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या दोन्ही सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. वारिस खान, मोहम्मद कुरेशी अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत.कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात ही दुसरी टोळी उदयास आली होती. या इराणी चोरट्यांच्या संपर्कात येऊन त्यांनी चोऱ्या सुरू केल्या होत्या .अखेर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.ही मानपाडा पोलिसांची मोठी कामगिरी आहे.