नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आम्ही कसे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे दाखविण्यासाठी आज 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रु. दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी घोषित केला आहे.
जर तुम्ही खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने असता तर तुम्ही कांद्यावर निर्यात शुल्क लावलेच नसते. केंद्र सरकार खरेदी करणारा 2 लाख मेट्रिक टन कांदा हा तर मार्केटमध्ये येणार 2 दिवसांचाच कांदा आहे. मग उर्वरित कांद्याचे काय? त्यातही A ग्रेडचाच कांदा सरकार खरेदी करणार.
जर केंद्र सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर त्यांनी तातडीने लावलेले निर्यात शुल्क मागे घ्यावे व संपूर्ण मार्केटमध्ये येणारा कांदा खरेदी करावा. अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणारच, आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम आहोत, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.