मुंबई/प्रतिनिधी – राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या सोहळ्याला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार पवार म्हणाले, राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे. वैकुंठभाई मेहता, विठठ्लदास ठाकरसी, धनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत. या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक आहे. बँकेची ही उत्तम वाटचाल पाहता लोकांच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे मुल्यमापन केल्यास ग्रामीण जनजीवनातील घडलेले सामाजिक आणि आर्थिक बदल यातून सहकारातील दृष्टीकोन लक्षात येईल. देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. कृषी क्षेत्रातील योगदान वाढण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात गरिबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल.
सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्ट्ये जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.
बँकेचे पहिले संस्थापक, संचालकांच्या स्मृतींना उजाळा देत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, 110 वर्षांच्या मोठ्या कालखंडाची परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. विकास सोसायट्या, जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँका यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा फार मोठा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडविण्यात या बँकेचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रात बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करुन पुढे जात असताना भविष्यात या बँकेच्या माध्यमातून राज्यातील विकास सोसायट्या, जिल्हा बँका आणि नाबार्डच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे.राज्य सहकारी बँकेच्या पाठीशी शासन नेहमीच असेल, भविष्यात चांगले काम नक्कीच घडेल. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये राज्य सहकारी बँकेचा मोलाचा वाटा असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहकार चळवळीचे मोलाचे योगदान देणारे सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा.धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांच्या तैलचित्राचे अनावरण तसेच सर विठ्ठलदास ठाकरसी यांचे नातू सुधीर ठाकरसी आणि तैलचित्रकार विलास चोरमले यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी तर आभार व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी मानले.
Related Posts
-
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कडून “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील युवकांच्या नाविन्यतेस चालना…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
ठाणे येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी,…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कबड्डी महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच
नेशन न्यूज मराठी टीम. बारामती/प्रतिनिधी - विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर…
-
महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वंचितला जाहीर पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे कोरोना नियंत्रण उपायांमध्ये विशेष प्रकल्प
प्रतिनिधी. मुंबई - कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील आणि आशा वर्कर्स यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा…
-
सहकारी कुक्कुट पालन संस्थांना थकबाकीबाबत दिलासा
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक…
-
महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे २०२१ ची परतफेड १० ऑगस्ट २०२१ रोजी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.11/प्र.क्र.2/ अर्थोपाय…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिला आयोग महिलांशी संवाद…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
मंत्रालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी, त्यावरील…
-
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे विविध धोरणात्मक प्रश्नांसाठी आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/RnNRBqDPcq0 कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज कंपन्यांमधील…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन नागपूर मध्ये साधेपणाने साजरा
नागपूर/ प्रतिनिधी - आजपासून राज्यात सर्वत्र 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम…
-
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या 8 वर्ष मुदतीच्या एकूण…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त सोडतीच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ; १२ एप्रिल रोजी सोडत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त…
-
५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…
-
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कृषी पणन…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…