मुंबई प्रतिनिधी– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी आज सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ. सर भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी पालिका सभागृहातील डॉ. सर भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या अर्धपुतळ्यासदेखील आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२१) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी “ऐ” विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव तसेच महापालिका चिटणीस (प्रभारी) श्रीमती संगीता शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.

Related Posts