राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी – पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले तर मुंबईच्या संघाने ९४ गुणासह स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. सांगली संघास ३५ गुणासह तृतीय स्थानावर समाधान.



