जीएसटीच्या नावाखाली खाजगी शिक्षण संस्थेत १४ कोटी पेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार उघड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी-गोपानीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग – आठ(VIII) , च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे.मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक खासगी कंपनी राव आयआयटी अकादमी या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते, या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर 18% जीएसटी कर(GST)वसूल केल्याचा संशय आहे, परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशा प्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्क कंपनीच्या बाजूने गैरवापर केले गेले असे मानले जाते. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1(d) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर 14 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी(CGST) कायद्याच्या कलम 132(1(i) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीत शोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून यामुळे कर चोरी करणार्यांवर आळा बसेल