केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेला मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय हरित हायड्रोजन.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय हरित हायड्रोजन.
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – कुटुंब प्रमुखाच्या (एचओएफ ) संमतीने आधारमध्ये ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. या आधी अनिलकुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे सदस्य (पायाभूत सुविधा) म्हणून काम केले आहे. लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सच्या 1984 सालच्या तुकडीतून उत्तीर्ण झाले आहेत तसेच ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या लेव्हल-17च्या पहिल्या पॅनेलमध्ये समाविष्ट होते. त्यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, ग्वाल्हेर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आणि रुरकी विद्यापीठातून (IIT, रुरकी) अभियांत्रिकी (स्ट्रक्चर्स) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रेल्वेमधील त्यांच्या 36 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे. लाहोटी यांनी यापूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी अनेक महिने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.महाव्यवस्थापकीय पदावरील त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मालवाहतूक आणि सर्वाधिक संख्येने किसान रेल्वे चालवण्यासह सर्वाधिक संख्येने पार्सल वाहतूक टनेज वाहून नेण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते, ज्यातून रेल्वेला अधिक लाभदायी महसूल प्राप्त झाला. भाडे न देता, भंगार विक्री आणि व्यापक तिकीट तपासणी या मोहिमांद्वारे त्यांनी महसुलात विक्रमी सुधारणा घडवून आणली.मुंबईतील वातानुकूलित उपनगरी सेवांच्या विस्ताराचा प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळला आणि सोडवला. त्यांच्या कार्यकाळात,मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणी करून त्या आणि कार्यान्वित करण्यात मोठी झेप घेतली तसेच मध्य रेल्वेचा ठाणे उपनगरीय मुंबईतील दिवा आणि ठाणे दरम्यानचा बहुप्रतिक्षित पाचवा आणि सहावा मार्ग सुरू केला. गजबजलेल्या गाझियाबाद-प्रयागराज-DDU मार्गाला पर्याय म्हणून लखनौ-वाराणसी-DDU मार्गावरील मालवाहतूक सुधारण्यासाठी त्यांनी लखनौ, उत्तर रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना पुढाकार घेऊन अनेक कामे केली. त्यांच्या कार्यकाळात लखनौ विभागातील स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. उत्तर रेल्वेवर मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि मुख्य अभियंता (बांधकाम) या नात्याने त्यांनी नवीन रेल्वेमार्ग, ट्रॅकचे दुहेरीकरण आणि मल्टी-ट्रॅकिंग, यार्डांची पुनर्रचना, महत्त्वाचे पूल, स्टेशन बांधणी इत्यादी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. आनंद दिल्लीतील विहार टर्मिनल आणि नवी दिल्ली स्थानकाच्या अजमेरी गेट बाजूच्या स्थानकाच्या इमारतीची बांधकाम योजना त्यांनी तयार केली होती. नवी दिल्ली स्थानकाचा जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून पुनर्विकास करण्याच्या नियोजनाशीही त्यांचा जवळचा संबंध होता, ज्यात जमीन आणि हवाई जागेच्या व्यावसायिक विकासाचा समावेश होता. लाहोटी यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, पिट्सबर्ग, यूएसए येथे धोरणात्मक व्यवस्थापन आणि नेतृत्व कार्यक्रमांचे; तसेच बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली;आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद, अशा नामवंत संस्थांतून प्रशिक्षण घेतले आहे.त्यांनी हाँगकाँग, जपान, यूके, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील स्थानकांच्या विकासासह रेल्वेच्या जमिनीवरील व्यावसायिक विकासाचा अभ्यास केला आहे.रेल्वेमार्ग तंत्रज्ञान आणि (ट्रॅक टेक्नॉलॉजी) आणि रेल्वेमार्ग परिरक्षण यंत्रांच्या (ट्रॅक मेंटेनन्स मशीन) विकासासंदर्भात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. Related Posts ट्रायने मुंबई परवानाधारक सेवा क्षेत्राअंतर्गत.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या संकल्पना, उपाय आणि कृती आमंत्रित करण्याच्या उद्देशाने प्रज्वला चॅलेंज या.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – स्थलांतरामुळे मतदानाला मुकावे लागणे हाच एकमेव पर्याय असणे तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या युगात खचितच योग्य.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय वायूदलाने आज एसयु-30 एमकेआय (सुखोई) विमानातून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय लष्कराने 28 डिसेंबर 2022 रोजी अहमदाबाद छावणी येथे सैनिकांसाठी आपल्या पहिल्या 3D.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज 2023 या वर्षासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन छुप्या मेफेड्रोन निर्मिती केंद्रांवर.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात.