नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यात जात प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जात प्रमाणपत्रांची नक्कल, खोटी प्रकरणे रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक विजेत्या लेजीटडॉक (LegitDoc) या स्टार्टअपची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या डिजिटल स्वाक्षरी केलेली जात प्रमाणपत्रे नागरिकांना महाऑनलाइन पोर्टलद्वारे जारी केली जातात. तथापि, बहुसंख्य लोक सोयीच्या दृष्टीने जात प्रमाणपत्रे कागदी प्रिंटच्या स्वरूपात बाळगतात आणि यामुळे छापील कागदांवरील डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करणे शक्य होत नाही. डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे जारी करूनही आज जात प्रमाणपत्रांची नक्कल आणि खोटी प्रकरणे निदर्शनास येतात. हे टाळण्यासाठी आता ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पॉलीगॉन POS तंत्रज्ञानाचा वापर करून जात प्रमाणपत्रे ब्लॉकचेन प्रणालीद्वारे प्रमाणित करता येणार आहेत. प्रत्येक जात प्रमाणपत्रावरील महत्त्वाचे तपशील पॉलीगॉन POS ब्लॉकचेन सिस्टीमद्वारे क्रिप्टोग्राफिक QR कोड स्वरुपात दर्शविले जातील. या QR कोडद्वारे शासकीय विभाग अथवा इतर कोणत्याही कार्यालयांना या प्रमाणपत्राची पडताळणी व सत्यता सत्यापित करणे शक्य होणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागात राबविला जात असून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या एटापल्ली आणि भामरागडमधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली उपविभाग कार्यालयाच्या अधिपत्याखालील सुमारे 65 हजार जात प्रमाणपत्रांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. पुढील एका महिन्यात जात प्रमाणपत्रांचा सर्व डेटा ब्लॉकचेन प्रणालीमध्ये भरला जाणार आहे. QR कोड असलेली ब्लॉकचेन-सक्षम जात प्रमाणपत्रे जिल्ह्यातील सामायिक सेवा केंद्रांद्वारे (Common Service Centre) नागरिकांना प्राप्त करता येतील.
याबाबत श्री. कुशवाह म्हणाले की, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या की आज जागतिक स्तरावरही यशस्वी ठरत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या ठरलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी 15 लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात. हा उपक्रम प्रशासनात नाविन्यता आणण्यात मोठी भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले.
सहायक जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, या नावीन्यपूर्ण यंत्रणेमुळे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्रांच्या गैरवापरास आळा बसेल. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनद्वारे नवीन प्रमाणपत्रे ब्लॉकचेनद्वारे निर्गमित केले जातील.
लेजीटडॉक (LegitDoc) स्टार्टअपचे सहसंस्थापक नील मार्टिस म्हणाले की, प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी महाराष्ट्र शासन ई-गव्हर्नन्स उपक्रमांमधे वेब/ब्लॉकचेनसारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची बाब अतिशय महत्वकांक्षी व लक्षणीय आहे. अशा उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात आमुलाग्र सकारात्मक बदल दिसतील.
ब्लॉकचेन प्रणालीद्वारे निर्गमित केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची सत्यता अवघ्या 10 सेकंदांत सत्यापित करता येते. कुठल्याही प्रकारच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
Related Posts
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
सोलापूर/प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विकेंड…
-
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी, तिवरंग येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात 21 व…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
गडचिरोली जिल्हातील १८ तर भंडाऱ्यातील ७८ रस्त्यांची पुरामुळे वाहतुकी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागपूर विभागामध्ये गेल्या 24…
-
सोलापूर जिल्ह्यात २३ ठिकाणी पोलीस चेक पोस्ट, पास असेल तरच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला पायबंद घालण्यासाठी पर राज्यातून,जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात…
-
२५ फेब्रुवारीला जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी- जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ आज सकाळी…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश.
प्रतिनिधी. ठाणे दि.१०: नागरिकांनी, अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी,…
-
गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस – पालकमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जात असताना मंडळाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी…
-
तोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान,अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
रत्नागिरी/प्रतिनिधी - कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तोक्ते चक्रीवादळाच्या…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा
नागपूर/प्रतिनिधी - एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे…
-
अमरावती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन
अमरावती प्रतिनिधी- कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार दर…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
सोलापुर शहर जिल्ह्यात ८ मेच्या रात्रीपासून ते १५ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाला पायबंद…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा मागणी साठी सामाजिक कार्यकर्त्यांचे भोपळा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाभावी…
-
आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ फेब्रुवारीला नंदुरबार जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची…
-
महसुली कामकाजात गतिमानता, पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया…
-
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते…
-
लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक,…
-
गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली…
-
ठाणे जिल्ह्यात ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क
NATION NEWS MARATHI ONLINE. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24…
-
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देवू नये मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका…
-
महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या,…
-
ठाणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे - कृषीमंत्री दादाजी भुसे
प्रतिनिधी . ठाणे - कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक…
-
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे
मुंबई/प्रतिनिधी - बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
गडचिरोली जिल्ह्यासाठी २७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४० घरांचे नुकसान
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे…
-
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा -संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग…
-
ठाणे व पालघर जिल्ह्यात ९ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,…