नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील विदर्भात सध्या सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत अमरावती येथील तिवसा मतदारसंघातील सभेत जी राजकीय चिखलफेक झाली ती चांगलीच चर्चेत आहे. स्वाभिमान पार्टीच्या वतीने तिवसा मध्ये दहीहंडी सुरू असताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या जेव्हा विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या यादीमध्ये यशोमती ठाकूर यांचे सुद्धा नाव होते. यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद न मिळाल्याने आल्या नाहीत .यावर प्रतिउत्तर आमदार यशोमती ठाकुर देत आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या कि उगाच अफवा पसरवू नका.
नवनीत राणा तुम्ही वहिनी आहात, आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून स्वीकार केलं होतं.म्हणून निवडणुकीच्या वेळीच तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही दर दर फिरलो होतो. खासदार वहिनींचाच कास्ट सर्टिफिकेट खोट निघालं,वहिनीच चोर निघाल्या. अशी टीका यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर यशोमती ठाकूर यांनी केली.
आमच्या रक्ता रक्तामध्ये सर्वधर्मसमभाव आहे. काँग्रेसच्या पलीकडे आम्ही कोणताच विचार करू शकत नाही.आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही काँग्रेस सोडू शकत नाही.हनुमानजी तुम्हाला पुढच्या काळात हे दाखवून देतील असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.