नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत तपासणी मोहीम पार पडली. या तपासणीदरम्यान ५७९ पेट्रोल पंपधारक व २५४ किरकोळ दूध विक्रेत्यांची तपासणी करून ०५ पेट्रोल पंप धारकांवर पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणासाठी, तर २४ पेट्रोल पंप धारकांवर वजने मापे विहित मुदतीमध्ये पडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे खटले नोंदविण्यात आले. १७ पंप धारकांना वितरणात अनियमितता आढळून आल्याने संबंधित तपासणी अधिकाऱ्यांद्वारे परिशिष्ट १० प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या या त्रुटी सात दिवसांच्या आत पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले.
आवेष्टित दुधाबाबत एकूण २५४ आस्थापनांच्या तपासणी दरम्यान छापील किरकोळ विक्री किमतीपेक्षा (सर्व करांसहीत) अधिक दराने विक्री करणाऱ्या ३१ आस्थापनांवर वरील अधिनियम व नियमानुसार कारवाई करण्यात आली. तसेच सदर आस्थापनेद्वारा वापरात असलेले वजन व मापे विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे तसेच इतर उल्लंघनाबाबत ७२ खटले नोंदविण्यात आले.संपूर्ण मोहिमेत वैध मापन शास्त्र अधिनियम, २००९ तसेच त्या अंतर्गत महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ तसेच वैध मापन शास्त्र (आवेष्टित वस्तु) नियम, २०११ मधिल तरतुदींच्या उल्लंघनाबाबत एकूण १२५ खटले नोंदविण्यात आले.
पेट्रोल व डिझेलच्या वाढते दर तसेच दुधाच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने ग्राहक हितार्थ नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, तथा अपर पोलिस महासंचालक, डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
ग्राहकांच्या हितार्थ ही मोहीम राबविण्यात आली असून व्यापाऱ्यांद्वारे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी कोणतीही वस्तू, वजन अथवा मापाने खरेदी करीत असताना ते कमी दिले जात नाही ना याची दक्षता घ्यावी. प्रमाणित वजन व मापानेच वस्तू खरेदी करावी.
आवेष्टित वस्तू छापील किरकोळ विक्री किमतीपेक्षा (सर्व करांसहित) अधिक दराने विक्री करणे गुन्हा आहे. आवेष्टित वस्तूंवर वस्तूचे सामान्य नाव, उत्पादक/ आयतदार / आवेष्टक यांचे नाव व पत्ता, निव्वळ वजन/ माप, उत्पादित/ आवेष्टित / आयातीत केल्याचा महिना व वर्ष, किरकोळ विक्री किमत (सर्व करांसहीत). ग्राहक सेवा दूरध्वनी क्रमांक व ई-मेल इ. माहिती घोषित करणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, तशी तक्रार वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या https://www.vaidhmapan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करण्याचे आवाहन केलेले आहे.
Related Posts
-
बाप्पाची बैलगाडीवरून मिरवणूक काढत पेट्रोल डिझेल दरवाढीचा केला निषेध
कल्याण/प्रतिनिधी - दररोज वाढणाऱ्या इंधनांच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असतांनाच…
-
पेट्रोल पाच, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त,राज्य सरकारचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पेट्रोलच्या करात पाच…
-
महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करण्याची भाजपाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी…
-
भाजपची जन आशिर्वाद यात्रा ही पेट्रोल-डिझेल २०० रुपये पर्यंत नेण्यासाठी - नाना पटोले
बुलडाणा/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या राज्यातील चार मंत्र्यांची त्यांच्या…
-
कांदे खरेदी दर कमी केल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायाला हवा -मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी…
- मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे दि. ३० - महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील…
-
मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाटात मिशन ट्वेंटीएट
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - मेळघाटात मातामृत्यू व बालमृत्यू…
-
भिवंडीत अवैध वाळू उत्खनन करणारे दोन बार्ज व 3 पंप नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - महसूल यंत्रणेकडून…
-
फी कमी न केल्यास विद्यार्थ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करून…
-
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा…
-
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,कमी दर्जाचा फूड सप्लिमेंट साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने…
-
संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
प्रतिनिधी . अकोला - अकोला जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भावाला…
-
महाबाहू ब्रम्हपूत्रेवरील कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या क्रुझला केन्द्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केले रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बंगळुरू येथे 6-8…
-
केंद्रीय पथकाच्या महापालिकांना सूचना संख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका,पण मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण…
-
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा २७ लाख ३९ हजाराचा अन्नसाठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे…
-
जिल्ह्यांमधील कोरोना रुग्ण वाढ व ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर निर्बंध कमी अधिक शिथिल
मुंबई/प्रतिनिधी- ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता…