Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
पोलिस टाइम्स महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/g_32rVYZGdM?si=fE7ZyMTz6hHOAp-p

नवी मुंबई/प्रतिनिधी – वाहनांचा वापर अनेकजण करतात. पण प्रत्येकाला गाडी खरेदी करणे परवडेलच असे नाही. त्यामुळे काही लोक खिशाला परवडणाऱ्या स्वस्त आणि जुन्या गाड्या खरेदी करतात. मात्र जुन्या गाड्या खरेदी केल्याने आपल्याला जेलची हवा खावी लागू शकते. कारण नवी मुंबई पोलिसांनी देशातील विविध भागातून अवजड वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.ही टोळी बनावट कागदपत्राच्या आधारे चोरी केलेल्या वाहनांची विक्री करत असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे.

महाराष्ट्रासह नागालँड,अरूणाचल प्रदेशात, दिल्ली इतर राज्यातून चोरलेल्या गाड्यांचे बनावट कागदपत्र तयार करून त्या गाड्यांची विक्री हे चोरटे करत असत. यातील मुख्य सूत्रधार जावेद मणियार आपल्या इतर साथीदारांकरवी चोरी केलेले ट्रक त्यांचे खोटे कागदपत्र एका सहभागी परिवहन महिला अधिकारी यांच्या मदतीने बनवून त्या गाड्या विक्री करण्याचे काम करत होता. नवी मुंबई पोलिसातील परिवहन विभागाचे पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर आणि त्यांच्या टीमला याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. या आधारावर त्यांनी सखोल चौकशी आणि तपासाच्या आधारे चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश फाश झाला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल 29 ट्रक म्हणजेच पाच कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांचा या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.

Translate »
X