महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

सोलापूर मधीलअनगर गावच्या शिवारातून ६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त

सोलापूर/अशोक कांबळे – शेताच्या बांधावर गांजाच्या झाडांची लागवड करून विक्री करणाऱ्या अनगर तालुका मोहोळ येथील शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी कारवाई करित ६५ गांजाची झाडे ( अंदाजे गांजाचे वजन ६६ किलो ) असा एकूण अंदाजे ६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केल्याची घटना १२ जुलै रोजी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी हनुमंत धर्मा शिंदे या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मोहोळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी अनगर परिसरात गेले असता त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गांजाची लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.याबाबत तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह अनगर येथील रेल्वे रुळा लगत असणाऱ्या हनुमंत शिंदे वय ५५, रा. अनगर यांच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी शिंदे याने शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावुन त्याची विक्री करित आसल्याचे आढळुन आले. सदर ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीची तब्बल ६५  गांजाची झाडे मिळून आली. त्याचे वजन  ६६ किलो असुन तो गांजा जप्त केला असुन त्याची किमंत ६ लाख ८५ हजार ५०० आहे. कारवाईनंतर पोलिसांनी गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. व गांजाची झाडे जप्त केली आहेत. 

सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तहसिलदार जिवन बनसोडे , पो.नि. अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व सरकारी पंच उपस्थित होते .याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , अतीरीक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, स. फौ. युसुफ शेख, चंद्रकांत कदम, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी , पांडुरंग जगताप ,मंगेश बोधले, रविद्र बाबर , हरीष थोरात यांच्या पथकाने केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×