Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
लोकप्रिय बातम्या हिरकणी

कल्याण मध्ये हाथरस प्रकरणाच्या विरोधात कँडल मार्च

प्रतिनिधी.

कल्याण – उत्तर प्रदेशमध्ये युवतीवर झालेल्या भयानक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून निघाला आहे. याचे पडसाद सर्वत्र उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी कल्याणात कँडल मार्च काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि  सामाजिक संघटना व नागरी हक्क संघर्ष समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेश येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत संबंधित आरोपीना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. तर आंदोलकांतर्फे यावेळी तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले

यावेळी  महिला अध्यक्ष सारिका गायकवाड , बाबा रामटेके , संदीप देसाई , रेखा सोनवणे , उमेश बोरगावकर , मनोज नायर आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गायकवाड म्हणाल्या की महिला वरील हत्याचाराची मालिका केव्हा संपणार उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. तात्काळ आरोपींना फाशी देऊन पीडित १९ वर्षीय तरुणीला न्याय द्यावा .दरम्यान एक दिवस प्रेतांची अग्नी शांत होत नाही तोच बलरामपूर येथे मुलीचे हातपाय तोडून पाशवी बलात्कार करण्यात आला आहे त्यामुळे भाजप शासित राज्यात बेटी बचाओ बेटी पढाओ हि योजना फक्त नावाला आहे कि काय आस प्रश्न सामन्याच्या मनात आहे. 

Translate »
X