नेशन न्यूज मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महानगरपालिका भवनात परिचारिका भरती साठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यात काही अपवाद वगळता सर्वच उमेदवार या महिलाच होत्या.ठाणे महापालिके तर्फे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परिचारिका पदासाठी 72 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या. या 72 पदांसाठी राज्यभरातून जवळपास 450 हुन जास्त उमेदवार आल्याने त्यांची व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला.त्यामुळे त्यातील काही उमेदवारांना चक्क पहिल्या माळ्यावर असणाऱ्या लॉन च्या आणि महापौर कार्यालयाच्या लॉबीतच त्यांना जमिनीवरच बसवण्यात आले.
मुलाखतीचा नंबर आल्यावर तिसऱ्या मजल्यावर त्यांना पाठवण्यात येत असे.सदरचा प्रकार लक्षात आल्यावर तसेच पत्रकरांनीही याबाबत प्रशासनाला विचारणा केल्यावर तात्काळ या सर्व उमेदवारांना पालिकेच्या सभागृहात बसवण्यात आलं.याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या उपायुक्त कार्यालयात धडक देत पालिकेला यबाबत जाब विचारला.एवढी गर्दी येणार याची माहिती असूनही पालिकेने नीट व्यवस्था केली नाही जर गडकरी अथवा घाणेकर नाट्यगृहात मुलाखती घेतल्या असत्या तर हे टाळता आले असते असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसन म्हंटले.
तर आम्ही आलेल्या सर्व उमेदवारांची योग्य ती काळजी घेतली असून त्यांना सकाळी सभागृहातच बसवण्यात आल होतं मात्र गणपती उत्सवा संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने फक्त काही काळासाठी त्यांना बाहेर बसवण्यात आल होत त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय झाली नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी आलेल्या गरजूनच असा अनादर करणे कितपत योग्य आहे असा प्रश्र्न सामान्य नागरिकांच्या मनात आहे.