ठाणे/प्रतिनिधी – चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षरुपी रोपट्याला आता बहर येऊ लागला आहे. कोरोना काळात अखंडितपणे रुग्णांना सेवा देणारा मदत कक्ष अशी या वैद्यकीय मदत कक्षाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अवघ्या चार वर्षांत लाखो रुग्णांना मदत करण्यासोबतच तब्बल ६० कोटी रुपयांची सवलत रुग्णांना मिळवून देण्यापर्यंत काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ठाणे शहरातून सुरू झालेले वैद्यकीय मदत कक्षाच्या 22 जिल्ह्यामध्ये शाखा पसरल्या आहेत. छोट्याशा ऑफिसमधून सूरु करण्यात आलेला हा आरोग्ययज्ञ यापुढेही अखंडितपणे सुरू रहावा, अशी इच्छा राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
कोरोना नियंत्रणात आणतानाच लाखो रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचं काम कोविड योद्ध्यांनी केलं आहे त्यांच्या कार्याला सलाम करीत असताना अद्याप आपलं पूर्णपणे कोरोनामुक्त झाले नाही याचं भान सर्वांनी बाळगल पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असून तिसऱ्या लाटेला थोपविण्यात आपण यशस्वी होत आहोत. मात्र सर्वांनी अधिक काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करण आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.पालकमंत्री शिंदे म्हणाले, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून अविरत कार्य सुरू आहे. वैद्यकीय मदतीसोबतच नैसर्गिक आपत्तीतही या कक्षामार्फत सामान्यांना सेवा देण्याचं काम केलं. जात. त्यात कुठलाही व्यावसायिक हेतू डोळ्यासमोर न ठेवता हे काम या कक्षाच्या चमू मार्फत केल जात ही अभिनंदनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना वैद्यकीय सहाय्य करण्याचं काम अहोरात्र केलं गेलं. ठाण्यामध्ये अवघ्या 22 दिवसात 1150 खाटांच सुसज्ज असं कोविड रुग्णालय उभारलं गेलं. त्यात आयसीयू, डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगामी काळात याच तातपुरत्या रुग्णालयाचे कायमस्वरूपी रुग्णालयात रूपांतर करून तिथे कर्करोग रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील आठवणी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. मात्र अशाही परिस्थितीत वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यकर्त्यांनी, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी जीवाची बाजी लावून लोकांना मदत केली. त्यामुळे कोरोनातून लाखो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे कोरोना योद्ध्यांच हे काम नक्कीच अभिनंदनीय आहे, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
आता कोरोनाची दुसरी लाट काहीशी नियंत्रणात असली तरी तिसरी लाटेच्या धोका उद्भवू नये यासाठी सर्वानीच मास्कचा वापर आणि कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना पूर्णपणे गेल्याशिवाय मास्क वापरत जा, गर्दी टाळा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी यावेळी केले. रुग्णसेवेतून नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम- राज्यमंत्री कु. आदिती तटकरे
गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत करतानाच दुसरीकडे सामाजिक जाणीवेतून मदत कक्षाचे काम सुरू आहे. त्यामुळे हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम करीत असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी काढले. रुग्णाचे प्राण वाचल्यानंतर त्याच्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्यासारखे समाधान नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड, चिपळूण या भागात पुर परिस्थिती कशाप्रकारे मदत केली याची आठवण त्यांनी सांगितली. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचं काम होत असल्याचे राज्यमंत्री बच्ची कडू यांनी सांगितले. रुग्णसेवेच्या बळावर मी आमदार झालो याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.चार वर्षापूर्वी वैद्यकीय मदत कक्षाचं लावलेलं रोपट आता जोमाने वाढत असून त्याचा 22 जिल्ह्यांमध्ये विस्तार झाल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
सामाजिक जाणीवेतून ही सेवा सुरू असून लाखो लोकांना सेवा देण्यासाठी कक्ष काम अविरत सुरू राहील असे त्यांनी सांगितले.यावेळी राज्यभरातील कोरोनायोद्ध्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये शंभरहून अधिक शासकीय अधिकारी, संस्था, रुग्णालये, महापालिका, खासगी रुग्णालये, खासगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरविण्यात आले. मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी आमदार लंके, डॉ. लहाने, डिजीटल मीडीयाचे संपादक राजा माने यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचा चौथा वर्धापन दिन सोहळा येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला त्यावेळी मंत्री शिंदे बोलत होते. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, विधी व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नीलेश लंके, विश्वनाथ भोईर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, व्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Related Posts
-
भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिवंडी/ प्रतिनिधी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विंचूर बाजार समिती पाठोपाठ…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
एमबीए, एमएमएस सीइटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मनसे आमदाराची मागणी
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
ठाणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे मतदारसंघ शिवसेना, भाजपचा…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद…
-
कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची प्रसूती प्रकरणी मनसे आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रुग्णालय गेटवर महिलेची…
-
ठाणे जिल्ह्यातील आजअखेर पर्यत ५६ हजार मजुर मूळगावी रवाना
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये रात्र अभ्यासिका सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या…