महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी मुंबई

भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून  कार्यालयीन कामकाजाच्या 15 दिवसांत अर्ज मागविण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्ह्यातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्राधान्य असेल. संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे, संस्था नोंदणी अधिनियम व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेशन क्षेत्रातील अनुभव आवश्यक असून जास्त अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
संस्थेची घटना व नियमावली आवश्यक असून ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उद्देश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षाचा अहवाल (ऑडिट रिपोर्ट), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे, संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे. ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कुऱ्हाडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×