नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – मध संचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे दि. २० मे २०२३ रोजी जागतीक मधमाशी दिनांचे औचित्य साधुन मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या लाभार्थीस मधमाशी मित्र पुरस्कार वितरण करण्यांत येणार आहे. मंडळाचे मध संचानालय महाबळेश्वर, येथे पुरस्कार वितरण सोहळा दि. २० मे २०२३ रोजी आयोजित केलेला आहे. तेव्हा मधमाशा उद्योगामध्ये सातेरी, मेलीफेरा, व आग्या मधमाशाचे संगोपन करून मधाचे उत्पादन घेणा-या व्यक्ती/संस्था यांचे कडुन पुरस्कारासाठी निवड करण्यांत येणार या करीता अर्ज मागविण्यांत येत आहे.
तेव्हा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, ठाणे लक्ष्मी विष्णु सदन, महर्षी कर्वे रोड, नौपाडा ठाणे या ठिकाणी अर्जासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, ठाणे यांचे व्दारे करण्यांत येत आहे.- अधिक माहितीसाठी संपर्क – श्रीम. अंजना संजय गायकवाड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी व वसंत रामदास चौधरी, मधुक्षेत्रीक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, ठाणे, लक्ष्मी विष्णु सदन, महर्षी कर्वे रोड,नौपाडा, ठाणे- दुरध्वनी क्रमांक- ९४२२९८२६२१ मेल – dviothane@rediffmail.com.