नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – काल सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान करत 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आता सर्व अडथळे दूर झाले आहे. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे कुणाला कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. कारण एका मंत्राकडे चार ते पाच खात्यांचा पदभार आहे.त्यामुळे कामे रखडली होती. लोकांची कामे निकाली निघावे. यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. आतापर्यंत भीती होती की न्यायालयाच्या निकालाशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार होणे शक्य नाही.मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण दूर झालेली दिसते.राज्यात काम वाढवायचं असेल आणि जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे.लोकांच्याही तशा प्रतिक्रिया आहेत.राज्याला व्यापक दृष्टीने काम करण्यासाठी मंत्रिमंडळ पाहिजे.कुणालाही मंत्री करा पण विस्तार करा असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी कागदपत्री यशस्वी लढा जिंकला असेही विधान बच्चू कडू यांनी केलं तर मंत्रिमंडळ विस्तार आता खरच 20 ते 21 तारखेला होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं.