नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – नाशिक मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ज्यात दोन तरूणांनी जुन्या किरकोळ वादातून कॅब चालकाची चाकू भोसकून हत्या केली आहे. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यश गोनेकर असे मृताचे नाव आहे. शेख अरबाज ईकबाल आणि असलम ऊर्फ (गुड्डू मकसूद अन्सारी) अशी आरोपींची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर प्रकार घडला असून हत्येनंतर आरोपी फरार झाले.
त्याच वादाचा राग मनात ठेवून रात्रीच्या सुमारास आरोपींनी कॅब चालक यश गोनेकर याला अडवले. यावेळी मनात राग ठेवून दोन्ही आरोपींनी यश गोनेकर वर जोरदार वार केले. यात यश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण उपचारा दरम्यान यश गोनेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र उपचारा दरम्यान यशने आपल्या कुटुंबियांना आरोपींची नावे सांगितली होती. या आधारावर पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती यशोधरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक न्यानेश्वर भेदोड़कर यांनी दिली.