डोंबिवली/नेशन न्युज मराठी टीम – मार्च २०२० पासून करोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने टाळेबंदी लावण्यात आली होती.२०२२ मध्ये सरकारने टाळेबंदीत शितीलता आणल्याने दैनदिन जीवनात सुरुवात झाली.सर्व क्षेत्र हळूहळू सुरु झाले असताना खेळाडूंनीहि आपले खेळ दाखवण्याचा आणि सराव करण्यास केली. डोंबिवलीत फुटबॉल खेळाडूंना आपल्याच शहरात आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली.डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या अभिनव शाळेच्या मैदानात गोल्डन इगल्स फुटबॉल अकादमी आयोजित डोंबिवलीकर फुटबॉल लीग २०२१ भरविण्यात आली होती. यात विजेतेपद बी.वाय.बी.एफ सी ( भागशाळा यंग बॉय फुटबॉल क्लब ) संघाकडे तर द्वितीय पारितोषिक पालवा-एफसी (पलावा फुटबॉल क्लब )संघाला मिळाले.
स्पर्धेत एकूण १२ संघांनी भाग घेतला होता.अंतिम सामना बी.वाय.बी.फसी आणि पालवा-फसी या संघात लढत झाली. यात बी.वाय.बी.फसी संघातील खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.तर पालवा-फसी संघाला द्वितीय पारितोषिक घेऊन समाधान मानावे लागले.प्रथम पारितोषक १५ हजार रुपये, ट्रॉफी तर द्वितीय पारितोषिक १० हजार , ट्रॉफी देण्यात आले. यात १७ वर्षाखालील खेळाडून अमित मिश्रा,४० वर्षावरील खेळाडू निरज राणे, ऊत्कृष्ठ गोलरक्षक चषक वैभव वाडे ,ऊत्कृष्ठ टूरनामेंट सिद्धेश शेट्टी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. फुटबॉल खेळाला स्थानिक पातळीवर प्रशासनाने मदत केल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि डोंबिवलीतील फुटबॉल खेळाडू आपला खेळ देशपातळीवरच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत दाखवू शकतील असे यावेळी सांगितले. गोल्डन इगल्स फुटबॉल अकादमीच्या खेळाडूंनी सांगितले.
गोल्डन इगल्स फुटबॉल अकादमी आयोजित डोंबिवलीकर फुटबॉल लीग २०२१ ला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, सायली विचारे, समाजसेवक संजय विचारे,समाजसेविका सुरेखा पांडेयुवा ,योगेश म्हात्रे अमित म्हात्रे, उमेश पाटील, रविसिंग ठाकूर, मितेश पेणकर, आदि मान्यवर उपस्थित होते.