महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
इतर

सरपंच रुपाली कोकेरा यांना घर बांधून देत जिजाऊ संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

नेशन न्यूज मराठी टीम.

पालघर/संघर्ष गांगुर्डे – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने जिजाऊ संघटनेच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या डहाणू तालुक्यातील कंक्राडी- नंदारे ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली कोकेरा यांना घर बांधून देत जिजाऊ संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सध्या बहुतांशी ठिकाणी राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे. मात्र जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून निवडून आलेल्या डहाणू तालुक्यातील कंक्राडी- नंदारे ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली कोकेरा यांनी राजकारण हे केवळ पोट भरण्याचे आणि पैसा कमावण्याचे साधन नाही किंवा राजकीय पद हे सुद्धा कायमस्वरूपी नाही . आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी मिळालेली ती एक संधी असते हे दाखवून देत आपल्या साध्याश्या मोडक्या तोडक्या घरात राहून त्यांनी गावाच्या सरपंच पदाची जबादारी सांभाळत गावात विकासात्मक कामे करत आहेत .

जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी प्रत्यक्ष या गावात भेट देऊन पाहणी केली असता त्यांना सरपंच रुपाली कोकरा यांचा प्रामाणिकपण प्रत्यक्ष पाहता आला अगदी कुडाच्या घरात त्या राहतात . त्यांच्या याच कार्याची दखल घेत जिजाऊ संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना पक्के ghar बांधून देण्याचे ठरवले . ते घर आज बांधून पूर्ण झाले .जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या परिवारातील सदस्य कु. काश्वी निलेश पडवळे हिच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक २१ जून रोजी हे घर डहाणू तालुक्यातील कंक्राडी- नंदारे ग्रामपंचायत सरपंच रुपाली कोकेरा यांना सुपूर्द करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×