महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image इतर

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस व ट्रकचा अपघात, 2 ठार 30 जखमी

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे / प्रतिनिधी – मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील बिजासण घाटात मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.ब्रेकफेल ट्रकने बसला मागून धडक दिल्याने बस रस्त्यावर पलटली असून या अपघातात दोन जण मृत्यू तर 30 हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेवरील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील बिजासण घाटात मध्यप्रदेश परिवहन विभागाची इंदौर नाशिक बस शेंधवाहून शिरपूरच्या दिशेने जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचा ब्रके फेल झाल्याने भरधाव ट्रकने बसला मागून धडक दिली.अपघाताची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी बिजासण पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.उपस्थित नागरिकांच्या मदकार्य करण्यात आले.यावेळी जखमींना शेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघात दोन जणांचा मृत्यू तर बस मधील 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातानंतर काही काळ वाहतूक थप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×