महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी,चोरटे सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली/प्रतिनिधी. पंढरपूरला गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार घटना कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात एका बंगल्यात घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. 
कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात राहणाऱ्या गजानन पाटील यांच्या बंगल्यात सशस्त्र चोरटयांनी चोरी केली. या चोरटयांनी  गजानन पाटील यांच्या बंगल्यातून जवळपास 3 लाखांचे विविध प्रकारचे दागिने लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे  चोरी करताना चोरट्यांच्या  हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. गजानन पाटील हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता हा प्रकार घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे. मात्र हे चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×