नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – बंद घराची माहिती घेवून घरफोडी करणाऱ्या टोळक्याला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोलापूर जिल्ह्यात घरफोड्या करून हैदोस माजवणाऱ्या पाच चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने उत्कृष्ट कामगिरी करीत २४ घरफोड्या आणि दोन चोऱ्या असे २६ गुन्हे उघडकीस आणले आहे. या प्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून १५ लाख ५८ हजार ५९० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
घरफोडी आणि चोरी करणारे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत. जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर शहर, तालुका, टेंभुर्णी, सांगोला आणि करकंब तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागात त्यांनी धुमाकूळ घातला होता.बंद घराची पाहणी करून हे घरफोडी करत बघता- बघता गुन्हेगार लाखोंचा माल घेऊन पसार होत होते.