Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत

पिस्तुल आणि चाकू घेऊन दादागिरी करणे युवकला पडले महागात,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

सांभाजीनगर/प्रतिनिधी संभाजीनगर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.शहरातील पदमपुरा येथील मामा चौक येथे भरदिवसा दोन युवक हातात  पिस्तुल आणि चाकू घेऊन फिरत होते. युवकांमुळे परिसरातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.पण वेदांतनगर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जय कन्हैया भांडारकर असे आहे.आरोपी आणि त्याच्या मित्राने पिस्तुल आणि चाकू दाखवत स्थानिक नागरिकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करत असे.या दोन्ही आरोपींच्या विरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत,सीसीटीव्ही फुटेज, लोकेशनच्या आधारे आरोपी जय भांडारकर याला अटक केली.दुसरा आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे.

Translate »
X