नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – बुलढाणा येथील सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फूड ची शेती केलेल्या शेतकऱ्याने चोपडा येथे विक्रीसाठी ही फळ आणलेली आहेत. जैविक व सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फुड शेती केली असल्याने ड्रॅगन फूड फळाची मागणी चोपड्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
बाजारात मिळणाऱ्या फळापेक्षा वेगळे स्वादिष्ट व गोड आणि सेंद्रिय पद्धतीने स्वतः पिकवलेले फळ असल्याने बुलढाण्याहून खास मी या ठिकाणी विक्रीसाठी येत असतो. बाजारात रासायनिक फवारणी केलेली फळ मिळतात. परंतु सेंद्रिय व जैविक पद्धतीने नागरिकांना फळ द्यावी अशी ड्रॅगन फ्रुड ची शेती करणाऱ्या शेतकऱ्याने सांगितले ते स्वतः पाटबंधारे विभागात नोकरी करून स्वतः शेती करतात.